जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन वाढले नसून बाष्पीभवनामुळे धरणातील जलसाठा 5 टक्क्यांनी घटला आहे. जिल्ह्यात गेल्या 10 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर तापमान वाढले असून परिणामी हतनूर धरणातून दररोज 0.33 दलघमी बाष्पीभवन होत आहे. वाढत्या बाष्पीभवनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा 3 ते 4 टक्क्यांनी घटला असून मे व जून महिन्यातही धरणातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होण्याचा अंदाज व्यक्त केल्या जात असल्याने पुढील काळात धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत हतनुर धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी...