एकीकडे महाराष्ट्र विकासाच्या गप्पा मारतोय, तर दुसरीकडे वास्तव मात्र सुन्न करणारं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या लिया तांड्यातील रंजना राठोड यांची ही कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. बाळंतपणानंतर अवघ्या 45 दिवसांत त्यांना पुन्हा ऊसतोडीच्या फडात उतरावं लागलं आहे. पाठीवर सव्वा महिन्याचं बाळ आणि हातात ऊस तोडण्याचा कोयता घेऊन त्या दररोज 12 तास मेहनत करत आहेत. ज्या काळात आईला विश्रांती आणि बाळाला मायेची ऊब मिळायला हवी, त्या काळात या माऊलीला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ऊसतोड मजुरांचं कठोर वास्तव मांडणारी ही अंगावर शहारे आणणारी कहाणी आहे.