Jalgaon| दसऱ्याच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदीची लगबग; सुवर्णनगरीतील याच सुवर्णमय उत्साहाचा आढावा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जळगावची सुवर्णनगरी पुन्हा एकदा झळाळून निघाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी महिलांचा पारंपरिक दागिन्यांप्रती असलेला ओढा कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे... परंपरा, शुभ मुहूर्त आणि भविष्यातील गुंतवणूक या तिहेरी कारणांमुळे महिला ग्राहक सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीतील याच सुवर्णमय उत्साहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी...

संबंधित व्हिडीओ