Sangli | आर्थिक विवंचनेतून 'जलजीवन मिशन'च्या कंत्राटदाराची सांगलीत आत्महत्या; प्रशासनावर ताशेरे

हर्षल पाटील हे 'जलजीवन मिशन' अंतर्गत गावागावात नळपाणी योजनांचे काम करत होते. त्यांनी अनेक कामे पूर्ण केली होती, मात्र त्यांची सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांची देयके सरकारकडे प्रलंबित होती. याच आर्थिक विवंचनेतून आणि देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे त्यांनी मंगळवारी (२२ जुलै) शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, वृद्ध आई-वडील आणि दोन लहान भाऊ असा परिवार आहे.

संबंधित व्हिडीओ