Jalna| शिक्षणानं दिली उंच भरारी,रमेश गांगवेचे दुष्काळाने कापले पंख...काय घडलंय तरुणासोबत तुम्हीच ऐका

हातामध्ये उच्च शिक्षणाची पदवी, डोळ्यांत स्वावलंबनाचं स्वप्न आणि छातीत काहीतरी करून दाखवण्याची रग, पण आता दुष्काळाने हतबल केलंय. ही कहाणी आहे, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या कीनगावचा अवघ्या २५ वर्षांचा तरुण रमेश गांगवेची, उच्च शिक्षण घेऊन तो व्हेटरनरी डॉक्टर झाला. पांढरा ॲप्रन घालून नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभारून इतरांच्या हाताला काम देण्याचा बाणा त्याने दाखवला. गावच्या मातीत पाय घट्ट रोवून उभा राहण्याचा हा निर्धार होता, पण दुष्काळाच्या क्रूर सावटाने या सुशिक्षित तरुणाच्या कर्तृत्वालाच सुरुंग लावलाय.. रमेश गांगवेच्या स्वप्न दुष्काळाने कशी उध्वस्त केली आहेत..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ