जपानमधील 'ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025' मध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. 13 एप्रिलपासून सुरू झालेल्या या जागतिक एक्स्पोमध्ये 15 दिवसांसाठी महाराष्ट्राचे उद्योग दालन उभारण्यात आले आहे, जे इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 'इंडिया महाराष्ट्र पॅव्हिलियन'चे उद्घाटन झाले. या प्रदर्शनातून जगभरातील उद्योजकांना महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेची ओळख होणार आहे.