VSR चे मालक रोहित सिंह यांच्याबाबतचा धक्कादायक व्हिडिओ जय पवार यांनी समोर आणलाय. या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे.. या व्हिडिओत विमान उडत असताना रोहित सिंह हे मुख्य पायलटच्या सीटवर झोपले असल्याचं दिसतंय. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केलाय. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSRच्या सर्व विमानांचं उड्डाण थांबवावं.. तसंच रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जय पवार यांनी केलीय.