Jay Pawar | जय पवार बारामतीतून लढणार?, अजित पवारांचे सूचक वक्तव्य | NDTV मराठी

पत्नी सुनेत्रा पवारांना खासदार बनवलं. त्यात पार्थ पवारांना मैदानात उतरवण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता जय पवारांबाबत अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलंय. जय पवारांना बारामतीतून उमेदवारी देण्याबाबत अजित पवारांनी संकेत दिले. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवारला संधी देऊ असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे अजित पवार जय पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ