Shaktipeeth Highway वरून Jayant Patil विरुद्ध Jayakumar Gore चांगलीच जुंपली, पाहा नेमकं काय घडलं?

शक्तीपीठ महामार्गावरून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यात चांगलीच जुंपलीय. जयंत पाटील जुने जाणते नेते आहेत, त्यांच्या मालकीच्या जमिनीचा हिशोब केला तर जयंत पाटलांनाही उत्तर देता येणार नाही, असं म्हणत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय. 'देवाला भक्ताची जमीन गेलेली आवडत नाही, पण महाराष्ट्रातल्या देवाला मात्र जमीनी पाहिजेत', असं वक्तव्य करत जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. जयंत पाटलांच्या मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या या वक्तव्यावरच जयकुमार गोरेंनी उत्तर दिलंय.

संबंधित व्हिडीओ