राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्द्यावरून धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्राचे पथक महाराष्ट्रात दाखल झाले असून, खान्देशातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी दिवाळीपूर्वी मदत मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं रावल यांनी स्पष्ट केलं. तसेच रोहित पवार झुणका-भाकर खातात आणि फोटोसेशन करून जातात. हेलिकॉप्टरमध्ये पिझ्झा आणि सँडविच खाता, हे जगाला माहीत नाही का?” असा खोचक सवाल त्यांनी केला.
Some people eat Zhunka-Bhakari and leave after a photo session; Jaykumar Rawal criticizes Rohit Pawar.