राज्यात जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधील तब्बल 34 हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस आहे. "समान काम, समान वेतन" आणि उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय.. या संपामुळे राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले असून त्याचा थेट फटका सामान्य नागरिक, वकील, पक्षकार आणि न्यायव्यवस्थेला बसत आहे.
राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्हा आणि तालुका न्यायालयांचे दैनंदिन कामकाज जवळपास ठप्प झाले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झालेत. सरकारने मागण्या मान्य केल्याशिवाय माघार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय.. संपामधील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधलाय.. आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी.. पुणे सत्र न्यायालयाबाहेर कोर्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं.. याचा आढावा घेतलाय..आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी..