केवळ गांधी म्हणून देशप्रेम सिद्ध होत नाही, BJP च्या Chitra Wagh यांचा सोनिया गांधींवर निशाणा

वंदे मातरम्’ सुरू असताना सोनिया गांधी या इतरांशी संवाद साधत होत्या, हा राष्ट्रीय गीताचा आणि देशाचा अपमान असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. यासंदर्भात त्यांनी ‘वंदे मातरम्’वरील पुस्तक सोनिया गांधी यांना पाठवलं आहे. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत तर ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत असून दोन्ही देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. देशप्रेम कृतीतून दिसले पाहिजे आणि ‘वंदे मातरम्’मागील भावना काँग्रेस कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ