ठाण्याला लागून असलेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भात महत्वाचा निकाल सत्र न्यायालयानं दिला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावरती जागा नेमकी कोणाची याबद्दल कोर्टाने निर्णय दिलेला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आणि मशीद असल्यानं या जागेचा वाद अनेक वर्षांपासनं हिंदू संघटना आणि मुस्लिम संघटनांमध्ये रंगला होता. मुस्लिम संघटनेनं या जागेवरती दावा करत कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानं ऐतिहासिक निर्णय देत दुर्गाडी किल्ल्याची जागा ही राज्य शासनाच्या मालकीची असल्याचं म्हणत मुस्लिम संघटनेचा दावा कल्याण दिवाणी न्यायालयानं फेटाळून लावला.