Kankavli | रुग्णालयात तरुणीचा मृत्यू,नातेवाईक आक्रमक; कणकवलीतल्या खासगी रुग्णालयात राडा | NDTV मराठी

तरुणीच्या मृत्यूनंतर कणकवलीच्या खासगी रुग्णालयात मोठा राडा झालाय. संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली. कणकवलीमधल्या या खासगी रुग्णालयात या तरुणीच्या डोक्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी प्रचंड रक्तस्त्राव झाला. या तरुणीला मग कोल्हापूरमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र तिथल्या डॉक्टर्सनी तिला मृत घोषित केलं. संतापलेल्या नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह कणकवलीमधल्या खासगी रुग्णालयात आणला. त्यावेळी नातेवाईकांनी तिथल्या डॉक्टर्सना तसंच नर्सना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय.

संबंधित व्हिडीओ