Kashmir Snowfall | काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबली, विमानसेवा सुरळीत | NDTV मराठी

काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु, शनिवारी या स्थितीत सुधारणा होऊन श्रीनगर विमानतळावरून हवाई सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, बहुतांश भागांत तापमान शून्याच्या खालीच नोंदवले गेले. 'आयएमडी' नुसार आज काश्मीरच्या पर्वतीय भागांत हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर, सोमवारपासून आणखी एका पश्चिमी विक्षोभाच्या परिणामी पुन्हा वातावरणात मोठा बदल होईल. यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत अनेक भागांत हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

संबंधित व्हिडीओ