मांजरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली! लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. नदीलगतच्या शेतशिवारात पिकांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.