Kolhapur | आदमापुरात भंडारा उत्सवादरम्यान 35 भाविकांना विषबाधा, शीतपेयातून विषबाधा झाल्याचा अंदाज

कोल्हापुरातील आदमापूर येथे संत बाळूमामांच्या भंडारा उत्सवादरम्यान भाविकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली. दर्शनासाठी आलेला काही भाविकांनी शीतपेय घेतल्यानंतर उलटी, मळमळ, पोटदुखी आणि जुलाब असा त्रास सुरु झाला.. रविवारी रात्री ही घटना घडली. भंडारा उत्सव असल्याने लाखो भाविक आदमपुरात आहेत. दरम्यान त्रास जाणवू लागल्यानंतर 35 जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेनं प्रशासन सतर्क झालं आहे. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे ही घटना चिंताजनक आहे.

संबंधित व्हिडीओ