कोल्हापुरात ऊस दरासाठी बैठक सुरू असतानाच गोंधळ झालाय.. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन, कारखानदार आणि शेतकरी संघटनांची ही बैठक होती.. त्यावेळी बैठकीला मंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी उपस्थित होते.. बैठकीपूर्वी शेतकऱ्यांना बसायला खुर्च्या नसल्याने गोंधळाचं वातावरण होतं.