कोल्हापुरातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय.शवागृहात मृतदेहावर ठेवलेला बर्फ सरबत आणि थंड पाण्यासाठी वापरण्यात आलाय.सीपीआर रुग्णालयाच्या समोरील हातगाडीवर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.रूग्णवाहिका मृतदेह सोडून आल्यानंतर राहिलेला बर्फ हे हातगाडीचालक सरबत आणि थंड पाण्यासाठी वापरत होते.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरिकांनी हातगाडीचालकाला चोप दिलाय.