Kolhapur Potholes| उचगाव गावात रस्ता नाही, 30 वर्षापासून रस्त्यासाठी लढा सुरू | Ground Report

कोल्हापूर शहरानजीक असलेल्या गावात गेल्या 30 वर्षापासून रस्त्यासाठी लढा सुरू आहे.. उचगाव या गावातील पूर्व भागातील मनेरमळा परिसरातील ही स्थिती. या ठिकाणी गेली अनेक वर्ष मुख्य रस्ताच बनवला गेला नाही.. विशेष म्हणजे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेला हा परिसर आहे.. पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यातून वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागतो.. रस्त्यासाठी स्वतः ची जागा देऊनही प्रशासन रस्ता करण्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे ही परिस्थिती असल्याचं जमीन मालक आणि ग्रामपंचायत सदस्य मणेर यांची प्रतिक्रिया आहे.. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी.

संबंधित व्हिडीओ