खर्डींची सुरुवात करूयात कोकण रेल्वे च्या बातमीनं. कोकण रेल्वेची वाहतूक आता कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे. जवळपास सव्वीस तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. दिवाणखवटी स्थानकाजवळ कोसळलेली दरड हटवण्यात अखेर यश आलेलं आहे पण track ची सुरक्षितता तपासल्याशिवाय वाहतूक सुरू करता येणार नाही असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय.