स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरानं पोस्ट करुन पुन्हा एकनाथ शिंदेंना डिवचलं.. मी माफी मागणार नाही अशी पोस्ट कुणाल कामरानं केलीए.. मी जे बोललो तेच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणार नाही, असा टोलाही त्याने लगावला आहे. कुणाल कामराने चार पानांची पोस्ट केलीए.. त्यातून त्याने आपली भूमिका जाहीर केली आहे. कामराने सत्ताधाऱ्यांना आणि शिंदे गटाला उपरोधिक चिमटे काढले आहे. कुणालने त्याच्या खास शैलीतून अत्यंत मार्मिक शब्दात या पत्रातून चिमटे काढले आहेत.