गोवंडी परिसरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केलेली आहे. विशेषतः गोवंडी परिसर आपण जर बघितलं तर मुस्लिम बहुल भाग मानला जातो आणि या भागात मोठ्या संख्येने मुस्लिम महिला बाहेर पडलेल्या आहेत.