#Latur #MarathaReservation #Maharashtra #NDTVMarathi लातूर जिल्ह्यात आरक्षणासाठी झालेल्या तिघांच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या आत्महत्या आरक्षणासाठी नव्हत्या, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृतांजवळ सापडलेल्या सुसाईड नोट्स (चिठ्ठ्या) दुसऱ्या व्यक्तींनी लिहिल्याचे सिद्ध झाले असून, या तीनही प्रकरणात आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.