Lionel Messi मुंबईत, महादेव प्रोजेक्टचा शुभारंभ मेस्सीच्या हस्ते होणार; याच संदर्भातला आढावा NDTV वर

फुटबॉल जगतातील दिग्गज लिओनेल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे.मेस्सीचं मुंबईत भव्य स्वागत होणार आहे. सायंकाळी 4:30 वाजता कलाकारांचा परफॉर्मन्स होईल,तर 5 वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना रंगणार आहे. कार्यक्रमाचा समारोप 6:45 वाजता स्टेज सेरेमनीने होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे ... दरम्यान लिओनेल मेस्सी मुंबईकडे येण्यासाठी रवाना झालाय..दरम्यान, कोलकाताप्रमाणे मेस्सीच्या कार्यक्रमात कोणताही राडा होऊ नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. आज दिवसभर १ हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मुंबईत राहणार आहे... जवळपास १५० पोलीस अधिकारी, ८०० पोलीस अंमलदार आणि कर्मचारी असा हजार पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.. अधिकचा बंदोबस्त म्हणून तीन एसआरपीएफच्या तुकड्या, क्यूआरटी फोर्स, आणि इतर पथकेही बंदोबस्तासाठी तैनात आहेत. मुंबईत आज जागतिक फुटबॉल खेळाडू मेस्सी दाखल होणार आहे, महादेव प्रोजेक्टचा शुभारंभ आज त्याच्या हस्ते होणार आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी

संबंधित व्हिडीओ