व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांमध्ये तणाव वाढला आहे. इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या नवीन दरानुसार, दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची ची वाढ झाली आहे. या बदलामुळे, दिल्लीत सिलेंडरची किंमत आता 2 हजार ऐवजी 3 हजार 071. 50 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 993 रुपयांनी वाढून 3,024 रुपये झाली आहे