राज्यभरात गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिक एजन्सीबाहेर रांगा लावतायत. तेव्हा तिथे वादविवाद होण्याचे तसंच अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर पळवापळवीचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे आता गॅस वितरकांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश अन्नपुरवठा विभागाने दिलेत. गॅस वितरकांवर हल्ला होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही संरक्षण मिळणार आहे. तसंच सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनालाही संरक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गॅसस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.