Maharashtra Drought | आता माघार नाही, शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी; ठाकरे गटाचा इशारा

Maharashtra Drought | आता माघार नाही, शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये जाण्याची तयारी; ठाकरे गटाचा इशारा No backing down now; ready to go to jail for farmers Thackeray faction warns the government. बुलढाणा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. पिकांचे नुकसान आणि वाढती आर्थिक अडचण यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकाराने 29 सप्टेंबरला बुलढाणा येथे शेतकऱ्यांचा भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत द्या, पीकविमा तातडीने द्या, पिकांचे पंचनामे करा आणि महावितरणची वीजव्यवस्था सुरळीत करा, अशा प्रमुख मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहेत.

संबंधित व्हिडीओ