राज्यातील शासकीय, इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै २०२५ पासून ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी घोषणा वित्त राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केली. यापूर्वी ५५% महागाई भत्ता होता. आता तो ५८% झाला आहे. फेब्रुवारी २०२६ पासून हा भत्ता रोखीने देण्यात येईल. मार्च २०२६ मध्ये गुढीपाढव्यानिमित्त जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम देण्यात येईल. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीसंदर्भात स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येतील. ५.१६ लाख शासकीय कर्मचारी व ८.७२ लाख निवृत्तिवेतनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.