एकीकडे अंगाची लाहीलाही होते, घामाच्या धारा निघतात तर दुसरीकडे रस्त्यावर गारांचा खच पडला आहे. रस्ता पांढरा शुभ्र दिसत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. छत्री काढायची की AC लावायचा?' असा प्रश्न पडला आहे.उष्णतेची लाट आणि अवकाळीचा कडाका अशा दुहेरी संकटात महाराष्ट्र सापडला असून, पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. विदर्भात आगीच्या झळा सोसाव्या लागत असतानाच पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशात तुम्ही काय काळजी घ्यायला हवी पाहूया.