विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालाय. पाच जागांच्या या निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात तीन तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 2 जागा जाण्याची शक्यता आहे. पुणे पदवीधर आणि संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यात जमा आहे. तर अमरावती शिक्षकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, पुणे शिक्षकची जागा भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित झालाय. तर नागपूर शिक्षक निवडणुकीचा निकालाला अजून काहीसा वेळ लागू शकतो. तिथे अजून उलटफेर होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामुळे शरद पवारांची ताकद वाढलीय.. कारण पुणे आणि संभाजीनगर पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा जाधव देशमुख तर छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. निवडणुकीचे सर्व अपडेट शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून जाणून घेतलेत. शरद पवार स्वत: या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.