Maharashtra Politics | मुंबईतल्या 50 जागांवर BJP-Shinde गटात रस्सीखेच? NDTV च्या हाती मोठी बातमी

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर येतेय... मुंबईत महायुतीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय खरा.. मात्र अंतर्गत जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याचं समजतंय. मुंबईतल्या 50 वॉर्डमध्ये भाजप - शिंदे सेनेमध्ये रस्सीखेच असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. शिंदे सेनेने मुंबईतल्या दीडशे जागांवर लक्ष केंद्रित केलंय.. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपनेही सहा महिन्यांपासून विशेष प्रयत्न सुरु केले आहेत.. शिंदेंकडे गेलेल्या 44 नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवारांना कडवी झुंज देत निवडणूक जिंकली होती. त्यामुळे जागावाटपात ही झुंज आणखीनच तीव्र होईल.. दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर, गोरेगाव या भागांतील काही वॉर्डांत अत्यंत कडवी लढत झाली होती. त्यामुळे या जागा लढण्यावरुन भाजप आणि शिंदे सेनेमध्ये रस्सीखेच दिसतेय.. त्यामुळे या जागा पुन्हा कोण लढवणार, हा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. या जागांवर शिंदे गटाने आपला दावा केला आहे. तर, भाजपही या जागा शिंदेंकडून खेचण्याच्या तयारीत आहे.

संबंधित व्हिडीओ