महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज ठाकरेंनी आज पुन्हा निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावेळी निवडणूक आयोगाने विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली पण विरोधकांनी मात्र यामुळे त्यांचं समाधान झालं नाही असं म्हणत 2 दिवसात महापालिकेचा जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करा अन्यथा पुढची भूमिका जाहीर करणार असा इशारा राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलाय, आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणार महत्वाचं असणारेय तर दुसरीकडे यावेळी राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ देखील समोर आणलेयत,अनेक ठिकाणी वडिलांपेक्षा मुलांचं वय जास्त असल्याचे पुरावे दाखवले तर एका पत्त्यावर अनेक मतदारांची नावांची नोंद असल्याचे देखील पुरावे राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर आणलेयत,