देशात कंपन्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यात एकूण २.६८ लाख कंपन्या नोंदणीकृत आहेत. देशभरात नोंद झालेल्या सुमारे १५ लाख कंपन्यांपैकी सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात आहेत. दिल्ली १.६० लाख कंपन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर उत्तर प्रदेश १.५७ लाख कंपन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.सरकारी आकडेवारीनुसार गुजरातमध्ये ७९,४७१, तर हरयाणामध्ये ७३,७१४ कंपन्या नोंदणीकृत आहेत. तुलनेने पंजाब खूप मागे असून तेथे केवळ २१,२९६ कंपन्या आहेत.मागील आठवड्यात लोकसभेत अनिल देसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. सरकारने स्पष्ट केले की, २०१६ मध्ये कंपन्यांच्या नोंदणीसाठी केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले, तसेच २०२४ मध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी) कार्यान्वित करण्यात आले.