नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतंय पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत शिव नामाचा जयघोष करत देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत आज दिवसभर आणि रात्रभर देखील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुलं असणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थान तर्फे चार दिवस व्हीआयपी दर्शन देखील बंद ठेवण्यात आलं.