आज महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण देशभरातील शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.धार्मिक मान्यतेनुसार आजच्याच दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह आजच्याच दिवशी झाला होता. याच दिवशी भारतवर्षात महाशिवरात्री साजरी केली जाते.अनेक भाविक या दिवशी उपवास करतात.दिवसभर शिवनाम घेऊन, रात्री देखील जागरण केलं जातं.शिवरात्र जागवली जाते.महाराष्ट्रातील ज्योतिलिंगांच्या मंदिरांमध्येही शिवरात्रीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.12 ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं असलेलं हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्यामुळेच या ठिकाणचं दर्शन घेतल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे.तर दुसरीकडे शिव नामाचा जयघोष करत देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत.आज दिवसभर आणि रात्रभर देखील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुलं असणार आहे.बीडच्या परळी येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथाचं महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत... काशी विश्वानाथ आणि उज्जैनच्या महाकाल मंदिरातही भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.