सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर महेश सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. 'हा सत्तेचा माज आहे,' असं म्हणत त्यांनी सरवणकरांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे निधीच्या चौकशीची मागणी केली असून, 'रुस्तमजी'मधील फ्लॅट्सवरूनही सरवणकरांना लक्ष्य केले आहे.