नाशिकमध्ये CNG चा पुरवठा सुरळीत होत नसल्याने सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवू लागलाय.त्याच पार्श्वभूमीवर आता पेट्रोल पंप चालकांनी बंदचा इशारा दिलाय. MNGL कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने पंप चालकांनी हा इशारा दिलाय.रोज निदान 10 तास सुरळीत CNG चा पुरवठा करण्याची मागणी चालकांनी केली.अन्यथा येत्या 26 एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यात सीएनजी विक्री बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय.नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनने हा निर्णय घेतलाय.