सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील राजकारण चांगलंच तापलंय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत सोसायटी गटातील मतदार बेपत्ता झालाय. याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत, पडळकरांच्या विरोधातील उमेदवार विनोद पवार आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.. या प्रकरणावरून माजी आमदार विक्रम सावंत यांनी पडळकरांवर जोरदार टीका केलीय. पराभव दिसत असल्यामुळे पोलिसांच्या बळाचा गैरवापर केला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.