नालासोपारा येथील कथित लव जिहाद प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी नालासोपारा पोलीस ठाण्याला भेट दिली. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाच्या माध्यमातून केला जाणार असल्याची, आणि या एसआयटीचे अध्यक्ष DCP रँकचे अधिकारी असणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली आहे.दरम्यान, तक्रारदार शिव उपाध्याय आणि हिंदुत्व वादी संघटनानी संबंधित तरुणाविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. प्रकरणातील आरोपांची सत्यता, व्हिडिओचे स्वरूप आणि ते प्रसारित करण्यामागील तथ्ये पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे आता पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Major update in the Nalasopara 'Love Jihad' case | 70 to 80 girls allegedly deceived? SIT to conduct an investigation