इस्रायलमध्ये प्रचंड मोठा उलटफेर होण्याची शक्यता निर्माण झालीय. यंदाची निवडणूक पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासाठी कठीण मानली जात होती. निवडणूकपूर्व सर्वेक्षणातही त्यांना स्पष्ट बहुमत तर दूरच पण ते पिछाडीवर असल्याचं सांगण्यात आलं. मात्र निवडणुकीनंतरच्या एक्झिट पोलमध्ये त्यांना बऱ्यापैकी आघाडी मिळालीय. इस्रायलमधील संसदीय निवडणुकीनंतर मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंत ८५.६% मतांची मोजणी पूर्ण झाली असून, बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील युती ५३ते ५४ जागांसह आघाडीवर आहे. दुसरीकडे, गादी आयसेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी युती ४८ जागा मिळवण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. अरब पक्षांची ‘जॉइंट लिस्ट’ आणि 'राअम' पक्ष मिळून एकूण १९ जागा जिंकण्याची शक्यता आहे. इस्रायली संसदेत एकूण १२० जागा आहेत आणि सरकार स्थापन करण्यासाठी ६१ जागांची आवश्यकता असते. निवडणुकीपूर्वी, जनमत चाचण्यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पराभवाचा अंदाज वर्तवला होता.