मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एकवर धारधार शस्त्रानं एकाची हत्या करण्यात आलीए. अलोक सिंग असं मृत व्यक्तीचं नाव असून किरकोळ भांडणतून हत्या झाल्याची माहिती मिळतेय.. दोघेही प्रवासी होते... लोकलमधून उतरताना भांडण झाल्यानं आरोपीनं अलोक यांची धारधार शस्त्रानं हत्या केली घटनेनंतर आरोपी फरार असून रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जातोय.