बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं मतदान पार पडलं.दिवसभरात 'अ' प्रवर्गाची 88.48 टक्के मतदान झालंय. यामध्ये 19 हजार 549 पैकी एकूण 17 हजार 296 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय.तर ब प्रवर्गात 99.02 टक्के मतदान झालं.९० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालंय. उद्या मतमोजणी होणार आहे.अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक मानली जाते.यात स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते.अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल, तर शरद पवारांचं बळीराजा पॅनल या निवडणुकीत होतं.त्यांच्या विरोधात चंद्राराव तावरे या निवडणुकीच्या रिंगणात होते.चंद्राराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल हे या निवडणुकीत आहे.