राज्यभर सध्या ऑपरेशन बांगलादेशी जोरदार सुरू आहे.भाजप नेते किरीट सोमय्या गावोगावी जाऊन जन्मदाखल्यांची पडताळणी करतायत.मालेगावमध्ये तर जन्मदाखले द्यायला स्थगिती देण्यात आलीय. या सगळ्यामध्ये मालेगावची बदनामी होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.याविरोधात मालेगावातले स्थानिक एकवटले आहेत.बांगलादेशींना पकडा मात्र शहरातला एकोपा बिघडवू नका, अशी त्यांची मागणी आहे.