कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे. हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.