राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीसाठी राज्य सरकारनं ५ हजारांची मदत जाहीर केली.. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या या मदतीवरून विरोधकांनी सरकारवर टीका केलीय. सरकारनं केलेली मदत ही कमी असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. तर काँग्रेसचं राज्य असलेल्या कर्नाटकात केवळ अडीच हजारचं मदतीचा दाखला देत नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय.सरकारच्या 5 हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर मनोज जरांगेंनीही टीका केलीय..