पूर्णा तालुक्यातील वझुर गावातून शेकडो मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईकडे निघाले आहेत. एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देत ग्रामस्थांनी त्यांना वाजत गाजत निरोप दिला. हे मराठा बांधव अंतरवाली सराटी मार्गे मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत.