हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका फेटाळण्यात आलीय.विनीत धोत्रेंनी ही जनहित याचिका दाखल केली होती..मात्र सुनावणीवेळी हाय कोर्टाकडून या याचिकेवर सवाल उपस्थित करण्यात आले. ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे झाले असा सवाल यावेळी हायकोर्टाकडून उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान त्यानंतर ही जनहित याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, असं म्हणत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली.. दरम्यान, हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जातोय.