मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्याला सत्ताधाऱ्यांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलनादरम्यान हे वक्तव्य आले आहे.