Marathi Bhasha Gaurav Din|पालघरमध्ये मराठी भाषा गौरव दिन जागर मराठीचा या संकल्पनेतून मराठी दिन साजरा

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात मराठी भाषा गौरव दिन जागर मराठीचा या संकल्पनेतून मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुनंदा चैरिटेबल अॅण्ड एज्यूकेशन ट्रस्टने साखरे टाकीचा पाडा आणि भारोळ या आदिवासी पाड्यांवर मुलांना आणि नागरिकांना कुसुमाग्रज यांच्या साहित्याविषयी माहिती दिली. तसंच त्यांच्या साहित्याचे वाचन करून, नृत्य, फुगड्या गाणी म्हणत मराठीचा जयजयकार करीत मोठ्या उत्साहाने मराठी भाषा दिवस साजरा केला.यावेळी वाचनालयाचे संस्थापक दिनेश गुडेकर यांनी मुलांना मार्गदर्शन करून मराठी भाषा दिवस आपण का साजरा करतो याचे मार्गदर्शन केले मराठी भाषेचे महत्त्व पटवून देवून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित व्हिडीओ